जळगाव, दि. 26 - मध्यप्रदेश राज्यात 28 नोव्हेंबर, 2018 रोजी राज्य विधानसभेसाठी मतदान होणार आहे. या दिवशी जि. बडवानी येथे मतदान करण्यासाठी मध्यप्रदेश राज्यामधुन जळगाव जिल्ह्यामध्ये आलेल्या मुळ निवासी कामगारांना मतदानात भाग घेता यावा. याकरीता 28 नोव्हेंबर, 2018 रोजी त्यांना एका दिवसाची सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे. असे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
०००
No comments:
Post a Comment