जळगाव
दि. 14:- येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित
जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पंडित नेहरू यांच्या
प्रतिमेस जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केले.
याप्रसंगी निवासी
उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव, करमणूक कर शाखेचे
तहसिलदार महेश चौधरी यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील व विविध विभागांचे
अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment