Tuesday, 13 November 2018

58 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे 15 नोव्हेंबरपासून आयोजन


       जळगाव, दि. 13 - शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 58 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी जळगाव केंद्रावर गुरुवार दिनांक 15 नोव्हेंबर 2018 पासून येथील भैय्यासाहेब गंधे नाट्यगृहात सुरु होणार आहे. अशी माहिती स्पर्धेच्या समन्वयक श्रीमती सरीता खाचणे यांनी दिली आहे.
            या स्पर्धेत दिनांक 15 नोव्हेंबर ते  7 डिसेंबर 2018 या कालावधीत दररोज संध्याकाळी 7.00 वाजता विविध नाटक सादर केली जाणार आहे.
            गुरुवार, दि. 15 नोव्हेंबर रोजी सायं 7 वा. पु. ल. देशपांडे लिखित व -  अनिल चापेकर  दिग्दर्शित एक झुंज वा-याशी हे नाटक अष्टरंग, इंदौर सादर करणार आहेत. शुक्रवार 16 नोव्हेंबर 2018 रोजी सायं 7 वा. वैभव भंडारी लिखित व संजय तारांबळे, दिग्दर्शित क्रांती हे नाटक भारतीय साहित्य सां. क. वि. मंच भुसावळ हे सादर करणार आहे. शनिवार, दिनांक 17 नोव्हेंबर, 2018  सायं 7 वा. नितीन गगे लिखित व चंद्रकांत जाडकर दिग्दर्शित षडरुपी हे नाटक भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, भुसावळ हे सादर करणार आहेत.  रविवार 18 नोव्हेंबर रोजी सायं 7 वा लेखक आणि दिग्दर्शक हनुमान सुरवसे यांचे हलगी सम्राट, राज बहुउद्द्येशीय संस्था, जळगाव, सोमवार दिनांक 19 नोव्हेंबर, 2018 सायं 7 वा. लक्ष्मण रेषा लेखक किरणकुमार अडकमोल, डॉ. अ.जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव, मंगळवार दिनांक 20 नोव्हेंबर, 2018 रोजी प्रेतस्थ, लेखक आणि दिग्दर्शक विश्वेश जोशी, ग्लोबल फाऊंडेशन, तामसवाडी, जळगाव. गुरुवार दिनांक  22 नोव्हेंबर, 2018 रोजी सायं 7 वा. महादेवभाई, लेखक रामू रामनाथ व दिग्दर्शक रमेश भोळे, इंदाई फाऊंडेशन पाचोरा, शुक्रवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सायं 7 वा. खेळ मांडला, लेखक आणि दिग्दर्शक विरेंद्र पाटील, जय गणेश फाऊंडेशन, भुसावळ हे सादर करणार आहे.
             शनिवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सायं 7 वा. बोला, गांधी उत्तर द्या, लेखक शरद भालेराव, दिग्दर्शक  चिंतामण  पाटील, कै. अप्पसाहेब वि. भालेराव प्रतिष्ठान,जळगाव. रविवार, दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायं 7 वा. बळी, लेखक रुपाली गुंगे,  दिग्दर्शक प्रा. बी. एम. गुंगे, गुरुकृपा सोसायटी, जळगाव. सोमवार दिनांक 26 नोव्हेंबर सायं 7 वा. तन-मन, लेखक रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक प्रतिक बिवलकर, महाराष्ट्र समाज, देवास, मध्य प्रदेश, मंगळवार दिनांक 27 नोव्हेंबर सायं 7 वा. एस फॅक्टर, लेखक  संदिप पाचंगे,  दिग्दर्शक मुकेश काळे, मानवता बहुद्देशीय विकास संस्था, धुळे, बुधवार दिनांक 28 नोव्हेंबर सायं 7 वा. रॅडक्लिफ लाईन, लेखक आणि दिग्दर्शक हेमत पाटील, मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव. गुरुवार दिनांक 29 नोव्हेंबर सायं 7 वा. संभवगाथा, लेखक सुशिल अत्रे व दिग्दर्शक बळवंत गायकवाड, परिवर्तन बहुद्देशीय विकास संस्था, जळगाव. शुक्रवार दिनांक 30 नोव्हेंबर सायं 7 वा. तिरथ में तो सब पानी है, लेखक सुरेश जाधव, दिग्दर्शक श्रीराम जोग, नाट्यभारती, इंदौर हे सादर करणार आहे.
            शनिवार दिनांक 1 डिसेंबर, 2018  सायं 7 वा. आमदार सौभाग्यवती, लेखक श्रीनिवास जोशी,  दिग्दर्शक रमेश लीला, केअर टेकर फाऊडेशन, जळगाव, रविवार दिनांक 2 डिसेंबर, 2018  सायं 7 वा. मुक्ती, लेखक ॲङ शैलेश गोजमगुंडे, दिग्दर्शक विशाल जाधव, समर्थ बहुद्देशीय विकास संस्था, जवखेडे, सोमवार दिनांक 3 डिसेंबर, 2018  सायं 7 वा. अडाण, लेखक राजेश पवार, दिग्दर्शक राजेश पवार / कारुणा लाड, सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालय, दीपनगर, मंगळवार दिनांक 4 डिसेंबर, 2018 सायं 7 वा. कोर्ट मार्शल, लेखक स्वदेश दिपक, दिग्दर्शक पंकज वागळे, सारस्वत ब्रम्ह समूह, इंदौर, बुधवार दिनांक 5 डिसेंबर 2018  सायं 7 वा. समर्थ गाथा, लेखक आणि दिग्दर्शक मनोज पेमगिरीकर, श्री. समर्थ रामदास नाट्यशाला समिती, इंदौर,  गुरुवार दिनांक 6 डिसेंबर, 2018  सायं 7 वा. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स,   लेखक राहूल बनसोडे, दिग्दर्शक अनिल कोष्टी, उत्कर्ष कलाविष्कार संस्था, जळगाव. शुक्रवार दिनांक 7 डिसेंबर, 2018  सायं 7 वा. एका उत्तराची कहानी, लेखक अरविंद लिमये, दिग्दर्शक श्रीकांत भोगले, वेल एन वेल पब्लिक एज्युकेशन सोसा, इंदौर हे सादर करणार आहे.
            जिल्ह्यातील नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा व मोठया संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन स्वाती काळे, संचालक, सांस्कृतिक कार्य विभाग यांनी केले आहे.   
                                                                ०००

No comments:

Post a Comment