जळगाव, दि. १ - येथील अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत
मे. एम व्ही. फुडस, ई- १४, एम. आय. ङि सी. जळगाव या उत्पादन संस्थेमध्ये अन्न
सुरक्षा अधिकारी श्री. विवेक पाटील व श्री. अ.कृ.गुजर यांनी भेट देवून तपासणी केली
असता या उत्पादन संस्थेत अत्यंत अस्वच्छ व घाणेरड्या स्थितीमध्ये अन्नपदार्थाचे
उत्पादन व साठवणूक केलेली आढळून आली आहे.
विभागाने बेसन लाडू व पेढयांचा नमुना
अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत विश्लेषणासाठी घेतला असून उर्वरित बेसन लाडू २८ किलो किमत ५६०० रुपये व
पेढा २४ किलो किंमत ८६४० रुपयेचा साठा जप्त करुन नष्ट केला. तसेच मे. विनायक ट्रेडिंग
कंपनी, एम. आय. ङि सी, जळगाव येथील संस्थेस भेट देवून अन्न सुरक्षा मानके
कायद्यांतर्गत रिफाईन्ड सोयाबीन तेलाचा नमुना विश्लेषणासाठी घेतला व उर्वरित
रिफाईन्ड सोयाबीन तेल अंदाजे ५ टन किंमत रु. ४ लाख ६ हजारचा साठा संशयावरुन जप्त
केला आहे.
दोन्ही उत्पादन संस्थांविरुध्द अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत पुढील
योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई सहाय्य्क आयुक्त (अन्न) अन्न प्रशासन
औषध प्रशासन, जळगाव श्री. यो. कों. बेंडकुळे यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा
अधिकारी श्री. अनिल गुजर व श्री. विवेक पाटील यांनी केली आहे. असे एका प्रसिध्दी
पत्रकाव्दारे विभागाने कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment