Monday, 26 November 2018

संविधान सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न






      जळगाव दि. 26- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, 2018 या कालावधीत संविधान सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त डॉ. बाबासाहेब आबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, समतादुत प्रकल्प (बार्टी) पुणे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय कार्यालयाच्या सहाय्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
     या सप्ताहाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आबेडकर सामाजिक न्याय भवन, जळगाव येथे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती श्रीमती वैशाली हिंगे जळगाव यांच्या उपस्थितीत संविधानाचे सामुहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले. सुत्र संचालन अनिल पगारे तालुका समन्वयक यांनी केले. यावेळी कार्यालय अधिक्षक गणेश बोरसे, समतादुत प्रकल्प अधिकारी, भाग्यश्री पाईकराव तसेच सर्व संलग्न महामंडळाचे प्रमुख अधिकारी व अन्य मान्यवर तसेच कर्मचारी, तालुका समन्वयक,  तालुका समतादूत उपस्थित होते.
           या सप्ताहानिमित्त शासकीय कार्यालय व शाळा, महाविद्यालय येथेही संविधान वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याअतंर्गत जिल्हा कारागृह, जळगाव येथे संविधान वाचन करण्यात आले होते. सदरील उपक्रमात जिल्हा कारागृह अधिक्षक श्री. अनिल वांडेकर यांच्या उपस्थितीत कारागृहातील बंदीसमक्ष संविधान प्रतीचे वाटप करुन संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
     तसेच शालेय स्तरावर ए. टी. झांबरे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे मुख्याध्यापक श्रीमती रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाने संविधान जागर प्रभातफेरीचे आयोजन करुन सामुहिकरित्या संविधानाचे वाचन करण्यात आले. सुत्र संचालन शिक्षक रविंद्र पाटील यांनी केले.
     त्याचबरोबर समाज कल्याण विभाग संचलित शासकीय वसतिगृह, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची निवासी शाळा, प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा येथे संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाजकल्याण  यांनी दिली आहे.
                                                                              ०००

No comments:

Post a Comment