Friday, 16 November 2018

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळणेसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत


        जळगाव, दि.16 - आदिवासी विकास विभागातंर्गत राबविण्यात येणा-या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती/शिक्षण फि, परिक्षा फि/व्यावसायीक अभ्यासक्रमाचा निर्वाह भत्ता योजना अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्नीत बॅक खात्यात थेट रक्कम जमा करणेत येत आहे.
         महाराष्ट्र शासनाकडून शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून  https://mahadbtmahait,gov,in  या संकेतस्थळावर स्कॉलरशीपच्या सर्व योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या असून अनुसूचित जमातीच्या शिष्यवृत्ती  पात्र विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज या संकेतस्थळावर 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत ऑनलाईन भरावेत. महाविद्यालयांनी सदर अर्जांची ऑनलाईन पडताळणी करुन मंजुरी द्यावी. यासंबधी प्राचार्य यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करावी. तसेच महाविद्यालयाच्या नोटीसबोर्डवरही सुचना लावाव्यात.
           ज्या विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाचे नाव किंवा अभ्यासक्रम दिसत नसल्यास त्यांनी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा. संबधीत महाविद्यालयांनी आपला प्रोफाईल व फिचा तपशिल ऑनलाईन अद्यावत करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील. असे  आर. बी. हिवाळे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment