जळगाव, दि. 17 - वजने मापे उत्पादक/दुरुस्तक/विक्रेते यांचे सन
२०१९ या सालाकरीता नुतनिकरणाची प्रक्रीया सुरु झालेली आहे. त्या अनुषंगाने वैधमापन
शास्त्र यंत्रणेतील वजने मापे परवानाधारक यांनी त्यांचे परवाने सन २०१९ करीता ऑनलाईन सादर करणे बंधनकारक केले आहे.
वैधमापन शास्त्र यंत्रणेने त्यासाठी
स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे. यापुढे सर्व परवानाधारक यांनी त्यांचे उत्पादक/दुरुस्तक/ विक्री परवाने
हे
http://www.vaidhmapan.maharashtra.gov.in:443/ Homepage/index.htr या संकेत स्थळावरुन नुतनीकरण करण्याचा अर्ज डाऊनलोड
करुन घ्यावा. व त्याबाबतची आवश्यक ती कागदपत्रे या संकेतस्थळावर दिनांक ३०
नोव्हेंबर, २०१८ चे आत अपलोड करणे बंधनकारक आहे.
याबाबत काही अडचणी येत असल्यास
कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक ०२५७-२४११४९ व भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३९२७४०४ येथे
संपर्क साधावा. असे आवाहन श्री. रा.भ.
बांगर, सहायक नियंत्रक, वैधमापन शास्त्र, जळगाव यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment