जळगाव, दि. 28 – जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी
जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
परंतू जळगाव महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणुक होणार असल्याने माहे 25 जून 2018
ते 3 ऑगस्ट 2018 या कालावधीत आचारसंहिता लागू झालेली आहे.
त्यामुळे जुलै महिन्यातील 2 जुलै 2018
रोजी होणारा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द
करण्यात आलेला आहे. असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांनी केले
आहे.
०००
No comments:
Post a Comment