Monday, 4 June 2018

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2018च्या तक्रारीबाबत नियंत्रण कक्ष स्थापन


             जळगाव, दि. 4 -   महाराष्ट्र विधानपरिषदेतील नाशिक विभागातील  शिक्षक मतदार संघातून  निवडून आलेल्या सदस्यांच्या सदस्यत्वाची मुदत दिनांक 7 जुलै, 2018 रोजी संपत आहे. सदर निवडणुकीसाठी दिनांक 25 जून, 2018 रोजी मतदान होणार असून, निवडणूक प्रक्रिया दिनांक 2 जुलै 2018 रोजी पूर्ण होणार आहे.
         या निवडणुकीसंदर्भातील काही तक्रार असल्यास ती दाखल करण्याकरीता निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द झाल्यापासून म्हणजेच दिनांक 31 मे, 2018 ते दिनांक 2 जुलै, 2018 पर्यंत कक्ष क्र.611, निवडणुक शाखा, सामान्य प्रशासन विभाग, सहावा मजला, विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई येथे 24x7 तत्वावर नियंत्रण कक्ष प्रस्थापित करण्यात आले आहे. या निवडणुकी संदर्भात तक्रार सादर करावयाची असल्यास ती नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्रमांक -022-22026441, व मोबाईल क्रमांक -9619204746, यावर करावी, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment