Saturday, 30 June 2018

जळगाव येथे 2 जुलै रोजी पेन्शन अदालतचे आयोजन


                जळगाव, दि. 30 - जळगाव डाक विभागातर्फे सेवानिवृत्त झालेल्या डाक कर्मचा-यांच्या पेन्शन विषयी  तक्रारी समजुन घेण्यासाठी 2 जुलै, 2018 रोजी दुपारी 4 वा. डाक अधिक्षक, जळगाव विभाग, जळगाव यांचे कार्यालयात  पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.
                      जळगाव डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या पेन्शन विषयीच्या ज्या तक्रारींचे निवारण 6 आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल. अशा तक्रारींची या पेन्शन अदालत मध्ये दाखल घेतली जाईल. अधिक माहितीसाठी  सहाय्यक अधिक्षक डाकघर (मुख्यालय), जळगाव यांचेकडे संपर्क साधावा व आपली तक्रार द्यावी, असे अधिक्षक डाकघर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment