Monday, 4 June 2018

जगन्नाथ पाटील माहिती अधिकारी म्हणून रुजू

             जळगाव, दिनांक 4 -  जिल्हा माहिती कार्यालयातील रिक्त असलेल्या माहिती अधिकारी पदाची सूत्रे जगन्नाथ पाटील यांनी आज स्वीकारली. कार्यालयाच्या वतीने सुरेश सानप यांनी पुष्प गुच्छ देवून त्यांचे स्वागत केले व भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यालयातील विनोद पाटील, प्रवीण बावा, श्रीमती उषा लोखंडे, दिलीप खैरनार, प्रमोद भंगाळे, अशोक मोराणकर, पंकज ठाकूर उपस्थित होते.
         श्री. पाटील यांनी यापूर्वी औरंगाबाद, जालना, पणजी गोवा, नंदुरबार, धुळे व नागपूर येथे सेवा बजावली आहे.
०००


No comments:

Post a Comment