Saturday, 30 June 2018

जिल्ह्यातील गणेश मंडळांची 3 जुलै रोजी बैठक आयोजित


        जळगाव, दि.30 - जिल्ह्यातील आर्थिकदृष्टया गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता जळगाव जिल्ह्यातील गणेश मंडळांनी मदत करण्याचे आवाहन धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी केले आहे. याकरिता जळगाव जिल्ह्यातील गणेश मंडळाची बैठक 3 जुलै, 2018 रोजी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव येथे दुपारी  12.30 वाजता आयोजित केलेली  आहे. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे.
 असे आवाहन चे. ऊ. तेलगांवकर, सहायक धर्मादाय आयुक्त, जळगाव विभाग, जळगाव यांनी दिली आहे.
            आर्थिकदृष्टया गरीब कुटुंबातील 10 वी परिक्षेमध्ये 85% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांना पुढील शिक्षणाकरिता आर्थिक मदतीची आवश्यकता असल्यास त्यांनी त्यांची गुणपत्रिका, उत्पन्नाचा दाखला यासहसार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, युनिटी चेंबर, इमारत ए, शुभम प्रोव्हीजनच्यावर, ख्वॉजामिया चौक, गणेश कॉलनी रोड, जळगाव या पत्त्यावर लेखी अर्ज सादर करावा. त्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य ती आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल. असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त, जळगाव यांनी केला आहे.
०००

No comments:

Post a Comment