Wednesday, 6 June 2018

डीएलएड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहिर


            जळगाव, दि. 6 - डीएलएड (डिप्लोमा लर्निंग एज्युकेशन) मध्ये सन 2018-19 वर्षात प्रवेशाकरीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक संचालक, विद्या प्राधिकरण, पुणे यांनी जाहिर केले आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन पडताळणी केंद्र, प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) गट क्र. 183-2,184, अजिंठा मार्ग, चिंचोली शिवार, येथे पडताळणी होणार असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांनी दिली आहे.
            शासकीय कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याचा दि. 4 ते 20 जून 2018. उमेदवारांनी पडताळणी केंद्रावर ऑनलाईन आवेदन पत्राची पडताळणी करुन घेण्याचा दि. 21 जून 2018 पर्यंत, गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्याचा दि. 23 जून 2018, पूर्ण भरलेल्या अर्जाची छाननी व गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याचा दि. 25 जून 2018, प्रथम फेरी प्रवेशाची यादी जाहिर करण्याचा दि. 26 जून 2018, प्रथम फेरीतील उमेदवारांनी प्रवेश घेण्याचा दि. 26 ते 29 जून, 2018, पहिल्या फेरीतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन यादी  DIECPD च्या  मेलवर पाठविण्याचा दि. 29 जून 2018, दुस-या फेरीसाठी विकल्प देणे ( उमेदवारास बदल करावयाचा असल्यास ) अन्यथा पूर्वी भरलेले विकल्प ग्राह्य धरले जातील दि. 30 जून 2018, दुसरी प्रवेश फेरी यादी प्रसिध्द करण्याचा दि. 2 जुलै, 2018, दुस-या प्रवेश फेरीतील उमेदवारांनी प्रवेश घेण्याचा दि. 2 ते 5 जुलै, 2018, दुस-या फेरीतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन यादी  DIECPD च्या  मेलवर पाठविण्याचा दि. 5 जुलै 2018, तिस-या फेरीसाठी विकल्प देणे (उमेदवारास बदल करावयाचा असल्यास) अन्यथा पूर्वी भरलेले विकल्प ग्राहय धरले जातील)  दि. 6 जुलै 2018, तिसरी व अंतिम प्रवेश फेरी यादी प्रसिध्द करण्याचा दि 8 जुलै, 2018, सर्व ऑनलाईन प्रवेश प्राचार्यांनी त्यांच्या Login वरुन Online Admit  करुन प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी DIECPD  च्या Email वर पाठविण्याचा दि. 12 जुलै 2018, DIECPD प्राचार्यांनी जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयनिहाय झालेल्या प्रवेशाची खात्री करुन घेण्याचा दि. 13 ते 15 जुलै 2018, प्रथम वर्ष सुरु होण्याचा दिनांक 16 जुलै, 2018 असा आहे.
            प्रत्येक फेरी प्रवेश यादी (Allottment) जाहिर झाल्यापासून ठरवून दिलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. हे वेळापत्रक संभाव्य असून यामध्ये बदल करण्याचा अधिकार अध्यक्ष, राज्यस्तरीय डी.एल.एड प्रवेश निवड, निर्णय व सनियंत्रण समिती, पुणे यांना राहणार आहे.
डी.ए.एङ प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक (व्यवस्थापन कोटा)
            संबधित अध्यापक विद्यालयांनी व्यवस्थापन कोट्याची प्रवेश प्रक्रिया प्रचलित नियमानुसार करणे- दि. 4 जून ते 16 जुलै, 2018, अध्यापक विद्यालयांनी व्यवस्थापन कोटा प्रवेशाचे प्रस्ताव संबधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे सादर करणे - दि. 16 जुलै 2018 पर्यंत, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्राप्त प्रस्तावावर निर्णय घेऊन संबंधितांना कळविणे - दि. 15 जुलै, 2018 पर्यंत, मंजूर व्यवस्थापन कोट्याची माहिती अध्यापक विद्यालयांनी ऑनलाईन भरणे-दि. 1 ते 15 जुलै 2018 पर्यंत, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांचे Login वरुन व्यवस्थापन कोटा मंजूर प्रवेशाची ऑनलाईन माहिती  Confirm  करणे- दि. 1 ते 16 जुलै, 2018 पर्यंत, प्रथम वर्ष सुरु होण्याचा दिनांक 16 जुलै 2018 नंतर डी.एल.एड प्रवेशाची लिंक चालू राहणार नाही. विहित कालावधीत माहिती न भरल्यास व विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्राचार्य, अध्यापक विद्यालय यांची राहील. असे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment