जळगाव, दि. 7 - सन 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वजनिक निवडणूकांसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवण्यासाठी सर्व सोयींनीयुक्त अशा जागेची निवड करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज रावेर लोकसभा मतदार संघासाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवावयाच्या भुसावळ येथील शासकीय गोदामाची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. निंबाळकर यांचेसोबत निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, भुसावळचे प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, तहसिलदार संजय तायडे, निवडणूक तहसिलदार सुरेश थोरात यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाच्या लोकसभा निवडणूकीसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बेंगलोर येथून प्राप्त होणार आहेत. ही इलेक्ट्रॉनिक यंत्रे चाळीसगाव व भुसावळ येथील गोडावून मध्ये ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले असून त्याची पाहणी आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केली. यावेळी सबंधित अधिका-यांना सुचना देतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, गोडावूनमध्ये इलेक्ट्रॉनिक मशीन सुस्थितीत रहावेत यासाठी गोडावूनमध्ये लाईट, एकझॉस्ट फॅन, सी.सी.टीव्ही कॅमेरा आदि सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्यात.
जळगाव लोकसभा मतदार संघात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव व पाचोरा तसेच रावेर लोकसभा मतदार संघात रावेर, चोपडा, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, व मलकापूर या विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात 3360 मतदान केंद्र असून त्यासाठी 7 हजार 488 बॅलेट युनिट, 4 हजार 354 कंट्रोल युनिट तर 4 हजार 354 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध होणार आहेत. या सर्व यंत्रे सुस्थितीत राहावी यासाठी गोदामात आवश्यक त्या सर्व सुविधा तयार करण्याच्या सुचनाहीत्यांनी यावेळी उपस्थितांना दिल्यात.
०००
No comments:
Post a Comment