Tuesday, 19 June 2018

पिक कर्जाची रक्कम रोखीने प्रदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे निर्देश


         जळगाव, दि.19- जिल्हा बँकेमार्फत शेतकरी सभासदांना पीक कर्जाचे वाटप ATM कार्ड व्दारे करणे बंधनकारक केले आहे. कर्जवाटपात बँकेमार्फत शेतकरी सभासदांना सक्तीने किसान क्रेडीट कार्डच्या खात्यावर ATM कार्डचे वाटप करून पिक कर्जाची रक्कम ATM कार्डच्या माध्यमातूनच शेतकरी सभासदांनी काढावी अशी सक्ती काही बँकांकडून करण्यात येत असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे. त्या अनुषंगाने पीक कर्जवाटप आढावा  बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी अत्यावश्यक निधीची गरज असेल अशा शेतकऱ्यांना पिक कर्जाच्या रकमा त्यांच्या बचत खाती जमा करुन जिल्हा बँकेच्या शाखांमधुन रोखीने प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.
              जिल्हयातील पात्र शेतकरी सभासदांनी त्यांच्या बचत खात्यात जमा केलेल्या पिक कर्जाच्या रकमा   संबंधित बँक शाखेतून रोखीने प्राप्त करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जळगाव यांनी केले आहे. तर जिल्हा बँकांच्या सर्व शाखांनी पीक कर्जाचे वाटप हे थेट शेतकरी सभासदांच्या बचत खात्यावर जमा करुन रोख रक्कम  उपलब्ध करुन द्यावी, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
००००००

No comments:

Post a Comment