Saturday, 30 June 2018

पडताळणीसाठी पाठविण्यात आलेली सेवापुस्तके घेऊन जाण्याचे आवाहन


         जळगाव, दि.30 - जिल्ह्यातील ज्या शासकीय कार्यालय प्रमुखांनी वेतन पडताळणी पथक, नाशिक यांचेकडे माहे एप्रिल 2018 पर्यंत सेवापुस्तके ( Service BooK) सादर केली आहे. त्यांची सेवापुस्तके पडताळून नित्कर्ष नोंदविण्यात आलेले आहेत. अशी माहिती श्री. लक्ष्मण मा. पाटील, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिली आहे. .
            ज्या कार्यालयांनी अद्यापही त्यांची सेवापुस्तके नेली नसेल त्यांनी वेतन पडताळणी पथक, नाशिक या कार्यालयाकडे प्राधिकार पत्रासह आपला प्रतिनिधी पाठवून घेऊन जाण्याची व्यवस्था करावी. तसेच ज्या कार्यालयांनी त्यांचे आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचारी यांचे सेवापुस्तकांची पडताळणी करुन घेतलेली नाही. अशा कार्यालयांनी सातवा वेतन आयोग लागण्यापूर्वी त्वरीत सेवापुस्तकांची वेतन पडताळणी करुन घ्यावी. असे सहसंचालक, लक्ष्मण मा. पाटील, लेखा व कोषगारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                     ०००

No comments:

Post a Comment