जळगाव, दिनांक 1 –महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाव्दारे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या अनुषंगाने 5 जुन, 2018 रोजी नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव याठिकाणी सकाळी 11 ते 5 या वेळेत जनसुनावणी आयोजित केलेली आहे.
तथापी,जळगाव जिल्ह्यात नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीची आदर्श आचारसंहिता दिनांक 24 मे 2018 ते 2 जुलै 2018 पावेतो लागु असल्याने सदर जनसुनावणीच्या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर्स, झेंडा तसेच इतर निवडणुक साहित्य घेऊन येऊ नये. तसेच आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे श्री. किशोर राजे निंबाळकर जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००
No comments:
Post a Comment