Friday, 1 June 2018

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा कृषि कार्यालयात कक्ष स्थापन


            जळगाव, दिनांक 1 - जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव येथे तात्पुरत्या स्वरुपात नवीन कक्ष स्थापन करण्यात आला असून येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तीन अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती रेशीम विकास अधिकारी सी. के. बडगुजर यांनी दिली आहे.
            जिल्ह्यात नव्याने सुरु करण्यात आलेल्या रेशीम उद्योगसाठी 200 शेतक-यांची ठराविक गावात व ठरावित तालुक्यात नाव नोंदणी करण्यात आलेली आहे. रेशीम उद्योगासाठी ग्रामपंचायत हद्दीत समुह/गट पध्दतीने नोंदणी केल्यास शासकीय योजनेचा लाभ सर्व शेतक-यांना घेता येईल. रेशीम विकास योजनेसंबंधी अधीक माहितीसाठी रेशीम विकास अधिकारी वर्ग-2, जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालय, प्रशासकीय इमारत टप्पा क्र. ३, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव येथे दूरध्वनी क्रमाक 0257/2239054/2236708 येथे संपर्क साधावा. असेही श्री. बडगुजर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0 0 0

No comments:

Post a Comment