जळगाव,
दि. 21 - आंतरराष्ट्रीय योग
दिनानिमित्त येथील श्री.छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल येथे योग दिन मोठ्या
उत्साहात साजरा करण्यात आला.
जळगाव
जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेचा
शिक्षण विभाग, जी. एम. फाऊंडेशन, ए. टी. नाना पाटील फाऊंडेशन, रेडक्रॉस सोसायटी, पतंजली
योग समिती, हौशी योग संघटना, स्वाभिमानी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने
योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी
खासदार ए. टी. नाना पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापालिका आयुक्त
चंद्रकांत डांगे, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी
सुनंदा पाटील, शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, पितांबर भावसार, रेडक्रॉस सोसायटीसह
विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी योगासने केली.
यावेळी विविध संस्थांच्या
विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके करुन दाखविली. या कार्यक्रमात शहरातील 33
पेक्षा अधिक शाळांचे सुमारे आठ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
हौशी
योगा संस्थेच्या डॉ. अनिता पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. जिल्हा
क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
000
No comments:
Post a Comment