जळगाव, दि. 29 विख्यात संख्याशास्त्रज्ञ प्रा.
प्रशांत चंद्र महालनोबिस यांचा जन्मदिन 29 जून हा “ सांख्यिकी दिन” म्हणून साजरा केला जातो. आज सकाळी येथील नियोजन भवनात जिल्हा नियोजन
अधिकारी श्री. दिनेश वाघ यांच्या अध्यक्षतेत
सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला. या वेळी
जिल्हा नियोजन अधिकारी (मानव
विकास) श्री. विजय राणे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती
पवार, सहा. प्रकल्प अधिकारी, जि.ग्रा.वि
यंत्रणा श्री. अडसुळ मा. जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. पी. एस. पाटील, अर्थ व
सांख्यिकी संचालनालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते,
यावेळी मार्गदर्शन करतांना श्री वाघ यांनी
सांगितले की, प्रा. प्रशांत चंद्र
महालनोबिस हे देशाच्या नियोजन आयोजन सदस्य होते. त्यांनी कलकत्ता येथे भारतीय सांख्यिकी संस्था या
संस्थेची स्थापना केली. ते भारत सरकारचे
सांख्यिकी सल्लागार होते. सांख्यिकी
मुळे देशाचे नियोजन कसे करता येते, हे त्यांनी सिध्द केले. या महत्वपूर्ण कामगिरी
मुळे त्यांना भारत सरकारने सन 1968 मध्ये
पद्यमविभुषण सन्मान देऊन गौरविले होते. या कार्यक्रमात कार्यालयीन सांख्यिकीची
गुणवत्ता हमी या विषयावर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.
प्रारंभी प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन
होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संशोधन सहाय्यक श्री.
ब. पं. नेरे, यांनी केले,
०००
No comments:
Post a Comment