Thursday, 14 June 2018

पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील यांचा जिल्हा दौरा


       जळगाव, दि. 14 - राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील हे शनिवार 16 जून, 2018 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
             शनिवार, दिनांक 16 जून, 2018 रोजी सकाळी  6 वा. 20 मि.नी.  अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व  वाहनाने  हॉटेल रॉयल पॅलेसकडे प्रयाण. सकाळी 6 वा. 35 मि.नी. हॉटेल रॉयल पॅलेस, जळगाव येथे आगमन व राखीव, सकाळी 9 वा. 30 मि.नी पालकमंत्री कार्यालय, नूतन मराठा कॉम्प्लेक्स येथे आगमन व राखीव, सकाळी 9 वा. 55 मि.नी. पालकमंत्री कार्यालय येथून वाहनाने (पदमावती) मंगल कार्याल्याकडे प्रयाण. सकाळी 10 वा. आगमन व शिक्षक मतदार संघातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासमवेत चर्चा. स्थळ :- पदमावती  मंगल कार्यालय, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ, जळगाव., सकाळी 11 वा. जळगाव शहरातील संस्था चालकांच्या भेटीसाठी राखीव. दुपारी 12 वा. श्री. भरत अमळकर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव, स्थळ :- पसाय बंगला, ए.टी. झांबरे शाळेच्यासमोर, जळगाव, दुपारी 1 वा. जळगाव येथून वाहनाने धरणगावकडे प्रयाण, दुपारी 1 वा 30 मि.नी. धरणगाव येथे आगमन व पदाधिका-यांसमवेत चर्चा, दुपारी 2 वा. धरणगाव येथून वाहनाने अमळनेरकडे प्रयाण. दुपारी 2 वा. 45 मि.नी अमळनेर येथे आगमन व पदाधिका-यांसमवेत चर्चा, दुपारी 3 वा. 45 मि.नी. अमळनेर, जि. जळगाव येथून वाहनाने धुळेकडे प्रयाण. रात्री 11.00 वा. धुळे येथून वाहनाने चाळीसगाव रेल्वे स्थानकाकडे प्रयाण रात्री 12.39 मि.नी. चाळीसगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण
                                                                        000

No comments:

Post a Comment