Saturday, 2 June 2018

ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज पाठविण्याचे आवाहन


            जळगाव, दिनांक 2 -  आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2012-13 ते 2017-18 करीता भारत सरकार मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परिक्षा फी, योजनांचे अर्ज https://etribal.maharashtra.gov.in  या संकेत स्थळावर अर्ज भरलेले आहेत. महाविद्यालयातील अनुसूचित जमातीच्या काही विद्यार्थ्यांचे अर्ज त्रृटी अभावी महाविद्यालय पातळीवर प्रलंबित असतील त्यांनी त्रृटींची पुर्तता करुन अर्ज तत्काळ सेंन्ड करवे ज्या महाविद्यालयांनी अद्याप पर्यंत शिष्यवृत्तीस प्राप्त विद्यार्थ्यांचे बी-स्टेटमेंट या कार्यालयास सादर केलेले नाहीत. त्यांनी बी-स्टेटमेंट शासन निर्णयात दिलेल्या बंधपत्रासह दि. 5 जून 2018 च्या आत प्रकल्प कार्यालयास सादर करावे. विहित मुदतीत प्रस्ताव सादर न केल्यास शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहील्यास यास संबधीत महाविद्यालयाचे प्राचार्य सर्वस्वी जबाबदार राहतील.
            ऑनलाईन अर्ज सेंन्ड करतांना जी काही तांत्रीक अडचण येत आल्यास etrbal.support@maharashtra.gov.in ctdnsk@yahoo.com  वर सविस्तर माहिती ई – मेल करावी असे आवाहन प्रकल्प अधिकारी हिवाळे , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
०००

No comments:

Post a Comment