Thursday, 14 June 2018

प्रदत्त मतदान होणार नाही याची दक्षता घ्या- जिल्हाधिकारी : श्री निंबाळकर



      जळगाव, दि. 14 :- नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या होत असलेल्या निवडणूकीत एक ही प्रदत्त मतदान (Tender vote)  होणार नाही यांची दक्षता निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचा-यांनी घ्यावी असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी आज नियोजन भवनात केले.
        नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणास श्री निंबाळकर मार्गदर्शन करीत होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की ही निवडणूक प्रक्रीया वेगळी असून यात मत पत्रिकेचा वापर करण्यात येतो. निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी सूचना प्राप्त होत असतात. त्यांचे पालन आपण करावयाचे असते. निवडणूक कामांसाठी आपली नियुक्ती झाल्यापासून आपण निवडणूक आयोगाचे अधिकारी / कर्मचारी असतो सर्वानी आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडावी आपसात समन्वय ठेवावा असेही ते शेवटी म्हणाले.
       प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी संगणकीय सादरीकरणा मार्फत उपस्थितीना माहिती दिली. मतदान साहित्य तपासून घ्यावे मतदान केंद्र कसे लावावे विविध पोष्टर मतदान कक्ष उभारतांना मागे खिडकी अथवा दरवाजा येणार नाही याची दक्षता घ्यावी विविध प्रपत्रे भरणे, बोटाला शाही लावणे, मतदार ओळख पुरावे, इत्यादी सर्व बाबीची माहिती देवून उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे समाधान केले.
०००

No comments:

Post a Comment