Friday, 15 June 2018

वाकडी येथील पिडीत मुलांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट


            जळगाव, दि. 15 - वाकडी येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी घटनास्थळास भेट दिली. तसेच त्यांनी मारहाण झालेल्या पिडीत मुलांची व त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.         
            यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, जळगावचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार गोविंद टिळेकर, पाचोऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंडे आदिंसह महसुल व पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
            त्याचबरोबर समाजकल्याण आयुक्त मिलींद शंभरकर, सहायक आयुक्त समाजकल्याण खुशाल गायकवाड, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनीही पिडितांची भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच पिडींत मुलांना शासनाच्यावतीने प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले.
000

No comments:

Post a Comment