Thursday, 14 June 2018

ना. गिरीश बापट यांची हाफकीन फार्मास्युटिकल्सला भेट


       


        जळगाव, दि. 14:- जेनेरिक औषधांची निर्मिती करणा-या येथील हाफकीन अजिंठा फार्मास्युटिकल्सला कंपनीला अन्न, औषध आणि नागरी पुरवठामंत्री श्री. गिरीश बापट यांनी भेट देवून पहाणी केली त्यावेळी त्यांच्या समवेत व्यवस्थापकीय संचालक श्रीमती संपदा मेहता, महाव्यवस्थापक जी.पी सुपे, संचालक श्री. सुभाष शंकरवार, गुणवत्ता नियंत्रक कर्णिक, तुषार चौधरी उत्पादन प्रमुख एस. के. रोकडे आदि उपस्थित होते.
        ना. बापट यांनी ओरएस व बीटा लॅक्टन युनिटला भेट देवून पहाणी केली अधिका-यांकडून माहिती जाणून घेतली त्यापूर्वी त्यांनी अधिका-यांची बैठक घेवून कंपनीची सद्द परिस्थितीची माहिती जाणून घेतली उत्पादन सुरु करण्यासाठी करावयाच्या आवश्यक कार्यवाही बाबत चर्चा केली. उपलब्ध मनुष्यबळ यंत्र सामुग्री आवश्यक असलेले अर्थसहाय्य याबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री निधी जिल्हा नियोजन समितीतुन अर्थसहाय्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. कामगारांच्या वेतन संदर्भातही  चर्चा यावेळी झाली प्रारंभी श्रीमती संपदा मेहता यांनी  ना. गिरीश बापट यांना शाल श्रीफळ, पुष्प गुच्छ देवून सत्कार केला.
                                                                      ०००

No comments:

Post a Comment