जळगाव, दि. 14 :- नाशिक विभाग शिक्षक मतदार संघांचे
निवडणूकीसाठी दिनांक 25 जून 2018 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 यावेळेत मतदान होणार
आहे. निवडणूकीच्या मतदानासाठी येणा-या मतदारांची ओळख पटविणे व तोतयेगिरीस प्रतिबंध
करणे यासाठी ज्या मतदारांना मतदार छायाचित्र ओळखपत्र ( EPIC) देण्यात आलेले आहे. त्यांनी सदरचे मतदार छायाचित्र ओळखत्र (EPIC)
मतदानाचा हक्क बजावण्याचे वेळी सादर करणे आवश्यक आहे. तथापि जे मतदार छायाचित्र
ओळखपत्र (EPIC) सादर करु शकणार नाहीत. त्या मतदारांनी खालील
पर्यायी पुराव्यांपैकी कोणतेही एक कागदपत्र ओळख व पुरावा म्हणून दाखविल्यास
त्यांना मतदान करता येणार आहे.
पासपोर्ट, वाहन परवाना, आयकर स्थायी
खाते क्रमांक (पॅन कार्ड), पदवी / पदविका
प्रमाणपत्र (छायाचित्र असलेले), राज्य शासन / केंद्र शासन / सार्वजनिक उपक्रम
यांनी निर्गमित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक/ पोस्ट यांनी निर्गमित केलेले
पासबुक ( दिनांक 31 मे 2018 रोजी किंवा पूर्वी उघडलेले खाते), मिळकतीचे दस्ताऐवज
जसे पट्टा, नोंदणीकृत खरेदीखत इत्यादी छायाचित्रासह शिधा पत्रिका (दिनांक 31 मे
2018 रोजी किंवा पूर्वी निर्गमित केलेले), सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले अ.जा./अ.ज/इ.मा.व
प्रमाणपत्र छायाचित्रासह (दिनांक 31 मे 2018 रोजी किंवा तत्पूर्वी निर्गमित
केलेले) शस्त्र परवाना दिनांक 31 मे 2018 रोजी किंवा तत्पूर्वी निर्गमित
केलेले) , सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र छायाचित्रासह
(दिनांक 31 मे 2018 रोजी किंवा तत्पूर्वी निर्गमित केलेले), आधारकार्ड, भारताचे नोंदणी महानिरीक्षक यांनी
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत दिलेले स्मार्टकार्ड, याबाबत जळगाव जिल्हयातील
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या सर्व मतदारांनी याची नोंद घ्यावी, असे किशोर
राजे निंबाळकर जिल्हाधिकारी जळगाव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment