Thursday, 28 June 2018

वृक्षारोपणाचा मुख्य कार्यक्रम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते


      जळगाव, दि. 28 – एक लक्ष 13 कोटी वृक्ष लागवड वृक्षरोपणाचा मुख्य कार्यक्रम दि. 1 जुलै रोजी सकाळी 10 वाजता जिल्हयाचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते धरणगाव तालुक्यातील एकलग्न या राखीव वन कक्ष क्र. 391 (अ) नागपूर- सुरत राष्ट्रीय महामार्ग क्र 6 ला होणार आहे.

               या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री गिरीश महाजन, सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वला पाटील हे उपस्थित राहणार असून तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये खासदार ए.टी. पाटील, खासदार श्रीमती रक्षा खडसे, आमदार सर्वश्री एकनाथराव खडसे, हरिभाऊ जावळे, उन्मेश पाटील, शिरीषदादा चौधरी, सुरेश दामु भोळे, संजय सावकारे, चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, सतिष पाटील, विधान परिषदेचे सदस्या श्रीमती स्मिता वाघ, विधान परिषद सदस्य चंदुलाल पटेल, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे उपस्थित राहणार आहेत. असे जळगाव उपवनसंरक्षक, डी.डब्ल्यु पगार, यावल उपवनसंरक्षक एस.एस.दहिवले, जळगाव विभागीय वन अधिक्षक सामाजिक वनीकरण विभागाचे बी.एम. पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment