जळगाव, दिनांक 1 –जळगाव कोषागारातुन वेतन घेणा-या राज्य शासनाचे सर्व निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारक तसेच इतर राज्यांचे शासनामार्फत निवृत्तीवेतन घेणारे निवृत्तीवेतन धारक यांच्या निवृत्तीवेतन विषयक अडीअडचणीचे निराकरण करणे व समस्या सोडविण्यासाठी 4 जून 2018 रोजी संध्याकाळी 5 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी जळगाव येथे मेळावा आयोजित केलेला आहे.
तरी निवृत्तीवेतन धारकांच्या समस्या जाणुन घेवुन समस्यांचे निराकरण यावेळी करण्यात येणार आहे. तरी संबंधितानी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्र. सि. पंडीत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0000
0000
No comments:
Post a Comment