Tuesday, 19 June 2018

जळगाव येथे 25 जून रोजी डाक अदालत


            जळगाव, दि.19 - जळगाव क्षेत्र संबंधीत टपाल सेवेविषयी किंवा पोस्टाच्या कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल, अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर जळगाव विभाग, जळगाव यांनी त्यांच्या कार्यालयात दिनांक 25 जून रोजी दुपारी 3 वाजता डाक अदालत आयोजित केली आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी संपूर्ण माहितीसह दोन प्रतीत अधिक्षक डाकघर यांचे कार्यालय, 1 ला माळा, हेड पोस्ट ऑफिस बिल्डिंग, जळगाव  - 425001 या पत्त्यावर पाठवावीत. असे अधिक्षक डाकघर, जळगाव  विभाग जळगाव  यांनी कळविले आहे.
००००००

No comments:

Post a Comment