Saturday, 2 June 2018

शासकीय वसतीगृहातील प्रवेश प्रक्रीया सुरु


           जळगाव, दिनांक 2 :-   सामाजिक न्याय विभागातर्फे कार्यरत असलेल्या मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (नवीन) मेहरुण रोड, सिंधी कॉलनी जळगाव सन 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी महाविदयालयीन विभागासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. विदयार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी प्रचलीत जून्या पध्दतीनुसार लेखी प्रवेश अर्ज भरुन त्वरीत वसतिगृह कार्यालयास जमा करावे ज्या वर्गवारीच्या जागा रिक्त आहेत त्याच वर्गवारीच्या विदयार्थ्यांना वसतिगृह प्रवेश गुणवत्तेनुसार दिला जाईल  असे आवाहन मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (नवीन) या वसतिगृहाचे गृहपालांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.   
                                                                          ०००००

No comments:

Post a Comment