Monday, 25 June 2018

सामाजिक न्याय दिनानिमित्त आज जळगावत समता दिंडीचे आयोजन


 जळगाव, दि. 25 - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा दिवस राज्य शासनातर्फे सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त मंगळवार दि. 26 जून 2018 रोजी सकाळी 9.00 वाजता जी. एस. ग्राऊंड येथून समता दिंडी काढण्यात येणार असून या दिंडीचा समारोप नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त खुशाल गायकवाड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. गायकवाड यांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment