Friday, 15 June 2018

सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा


जळगाव, दि. 15- राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री ना. दिलीप कांबळे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे-
रविवार दि. 17 जून, 2018 रोजी सकाळी 8.15 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व वाहनाने हॉटेल पॅलेसकडे प्रयाण. सकाळी 8.25 वा. हॉटेल रॉयल पॅलेसकडे जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 12.00 वा. हॉटेल रॉयल पॅलेस जळगाव येथून वाहनाने वाकडी ता. जामनेर जि.जळगावकडे  प्रयाण. दुपारी 1.00 वा. वाकडी ता. जामनेर येथे आगमन व पिडीत कुटूंबियांची भेट. दुपारी 2.00 वा. वाकडी ता. जामनेर येथून वाहनाने जळगावकडे प्रयाण. दुपारी 3.00 वा. हॉटेल रॉयल पॅलेस जळगाव येथे आगमन व राखीव. रात्री 10.45 वा. हॉटेल रॉयल पॅलेस जळगाव येथून वाहनाने जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 11.00 वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री 11.15 वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथून अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
000

No comments:

Post a Comment