जळगाव, दि.22 - फैजपुर
उपविभागातील अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वन हक्कांची मान्यता)
अधिनियम, 2006 आणि नियम, 2008 व सुधारणा नियम 2012 अंतर्गत प्रलंबित असलेल्या
वैयक्तीक वनदाव्यांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी फैजपूर येथे 26 व 27 जून 2018
रोजी वनमित्र मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अजित थोरबोले, उप
विभागीय अधिकारी, फैजपूर यांनी दिली आहे.
या
दाव्यांचा जलद गतीने निपटारा होणेसाठी संबधीत गावातील ग्रामस्तरीय वनहक्क समितीचे
अध्यक्ष / सचिव, ग्रामसेवक, तलाठी, वनपरिक्षेत्र अधिकारी व संबधीत वनपाल व वनरक्षक
यांच्यात समन्वय साधुन वनमित्र मोहिम राबविण्यात येणार असून 26 जून, 2018 रोजी
जामन्या, गाड्रया, लंगडा आंबा, उसमळी, हरीपुरा, रुईखेडा, मोहराळे, तसेच रावेर
तालुक्यातील कुसूंबे, लोहारा, जानेारी, मोहगण, तिड्या, अंधारमळी व पाल या गावातील तर 27 जून 2018 रोजी सावखेडासिम,
वाघझिरा, आंबापाणी, वड्री, चारमळी, हिंगोणा, गारबर्डी, गारखेडा, निमडया,
सहस्त्रिलिंग, लालमाती, व मोहमांडली या गावांतील दाव्यांबाबत बहुउद्देशीय
नगरपालीका हॉल, म्युनसिपल हायस्कुल शेजारी, फैजपुर येथे सकाळी 10 वाजता वनमित्र
मोहिम आयोजित करण्यात आली आहे. संबधीत दावेदार यांनी आपले दावे हे ग्रामस्तरीय
वनहक्क समितीकडे सादर करावे.
सर्व
संबधीत तलाठी, ग्रामसेवक, ग्रामस्तरीय वनहक्क समितीचे अध्यक्ष/सचिव, वनपरिक्षेत्र
अधिकारी व संबधीत वनपाल व वनरक्षक यांनी दिलेल्या तारखेला ग्रामस्तरीय वनहक्क
समितीने मागणी केलेल्या आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे. असे आवाहन डॉ.
थोरबोले, उप विभागीय अधिकारी, फैजपूर भाग, फैजपूर तथा अध्यक्ष उपविभागस्तरीय
वनहक्क समिती, फैजपूर भाग यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000
No comments:
Post a Comment