Wednesday, 29 August 2018

1 सप्टेंबर पासून मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम सुरु नागरीकांना लाभ घेण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन


         जळगाव, दि.29-  छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची घोषणा           मा. भारत निवडणुक आयोगामार्फत करण्यात आली असून दि. 01 सप्टेंबर 2018 ते 31 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेवून मतदार यादी अधिकाधिक निर्दोष असण्यावर आयोगाचा भर आहे. त्यादृष्टीने सदर कालावधीत विशेष मोहिम जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने राबविण्यात येणार असून या मोहिमेत सर्व पात्र व्यक्तींची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे ज्या मतदारांचा मतदार यादीत छायाचित्र नाही त्यांचा छायाचित्र संकलित करणे, मतदार यादीतील कृष्णधवल छायाचित्राऐवजी रंगीत छायाचित्र संकलित करणे, दुबार, मयत व स्थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे. तसेच ज्या मतदारांचा मतदार यादीमधील तपशीलात काही त्रुटी असेल तर त्याची दुरस्ती देखील सदर मोहिमेत करण्यात येणार आहे. यासाठी मतदार यादीभागनिहाय 3532 बीएलओंची नियुक्ती जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेली आहे.
              ज्या मतदारांना आपले नाव नोंदवावयाचे असेल किंवा तपशीलात दुरस्ती करावयाची असेल त्यांनी आपल्या यादीभागाच्या बीएलओ किंवा संबंधित तहसिल कार्यालयाच्या निवडणूक शाखेत संपर्क साधावा व या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हानिवडणूक अधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.
                                                                   ०००

No comments:

Post a Comment