Tuesday, 21 August 2018

जिल्ह्यात आजपर्यंत 383.6 मिलीमीटर पाऊसाची नोंद वार्षिक सरासरीच्या 58 टक्के पाऊस पडला


·       आजपर्यंत सर्वाधिक 470.7 मिमी इतका पाऊस एरंडोल तालुक्यात
·       सर्वात कमी 304.6 मिमी इतका पाऊस भुसावळ तालुक्यात
         जळगाव दि. 21 - जिल्ह्यात बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरु झालेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या वार्षिक सरासरी पर्जन्यमानात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 57.8 टक्के इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 663.3 मिलीमीटर इतके असून मागील वर्षी 21 ऑगस्ट, 2017 पर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त 48.5 टक्के म्हणजेच 320.9 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. तर यावर्षी मात्र 383.6 मिलीमीटर म्हणजेच मागील वर्षीपेक्षा 63 मिलीमीटर इतका पाऊस अधिक पडला आहे.
            जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता आजपर्यंत सर्वाधिक 75.5 टक्के इतका पाऊस एरंडोल तालुक्यात पडला असून सर्वात कमी म्हणजेच 45.5 टक्के पाऊस भुसावळ तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात दिवसभर सुरु असलेल्या संततधारेमुळे आज 21 ऑगस्ट रोजी एका दिवसात 36 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.
            जिल्ह्यात तालुकानिहाय आजपर्यंत (21 ऑगस्ट, 2018) पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (वार्षिक सरासरीशी टक्केवारी) जळगाव तालुका - 378.9 मिलीमीटर (55.1 टक्के), जामनेर- 370.4 मि.मी., (51.3), एरंडोल- 470.7 मि.मी. (75.5), धरणगाव - 467.6 मि.मी. (75.00), भुसावळ - 304.6 मि.मी. (45.5), यावल - 330.1 मि.मी. (47.3), रावेर - 380.3 मि.मी. (56.9), मुक्ताईनगर - 313.6 मि.मी. (50.1), बोदवड - 408.6 मि.मी. (61.1), पाचोरा - 428.2 मि.मी. (57.6), चाळीसगाव - 391.7 मि.मी. (59.3), भडगाव - 369.4 मि.मी. (55.1) अंमळनेर - 306.8 मि.मी. (52.7), पारोळा - 446.9 मि.मी. (72.5), चोपडा - 386.5 मि.मी. (55.9) याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या 383.6 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
०००

No comments:

Post a Comment