युनिसेफच्या सहयोगाने राज्य शासनाचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम हाती घेत आहे. विविध शाखांमध्ये पदवी व
पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती
प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेटपणे पोहचविणे हे ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
आजमितीला शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार हा
मुख्यत्वे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी
वाहिन्या आणि रेडिओ यांच्यामार्फत केला जातो. सोशल मीडियाचा होणारा उपयोग मर्यादित
स्वरुपाचा आहे. शिवाय, शासकीय
योजनांचे बहुतांश प्रस्तावित लाभार्थी हे अर्धशिक्षित, दारिद्रयरेषेखालील आणि दुर्गम भागातील असल्याने
वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीसंच
अथवा रेडिओ ही माध्यमे ते वापरतात असे नाही. प्रस्तावित लाभार्थ्यापर्यत न
पोहचणाऱ्या शासकीय योजना दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यत प्रभावीपणे
पोहचविण्यासाठी राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे सहाय्य
घेण्याचा ‘युवा माहिती दूत’
या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे. राज्यात 6 हजारपेक्षा
जास्त महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयामध्ये एकूण सुमारे 23 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी
शिकत आहेत. त्यापैकी किमान 5 ते 7 टक्के
विद्यार्थी म्हणजे किमान 1 लाख युवक या उपक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
योजनेची
अंमलबजावणी:
Ø
प्रत्येक
महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांमागे एक ‘मार्गदर्शक’ नेमण्यात येईल.
Ø
या
योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोबाईल
अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या मोबाईल ॲप्लीकेशनमध्ये प्रत्येक महाविद्यालयातील मार्गदर्शक, समन्वयक आणि सहभागी युवक यांचे अकाऊंट असेल. त्याचबरोबर
युवकांनी लाभार्थ्याना द्यावयाची माहिती भरण्याची सोय असेल.
Ø
महाविद्यालयातील
विद्यार्थी स्वत: या
ॲप्लीकेशनवर स्वत:च्या नावाची नोंदणी करू शकतात.
Ø
युवकांनी
लाभार्थ्यांना कोणत्या योजनांची माहिती द्यावी याकरीता तपशिल सांगणारा मजकूर/
व्हिडीओ/ एफएक्यू देण्यात आलेला असेल. त्याशिवाय योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक
असणारी कागदपत्रे, अर्जाचे
नमुने संबंधित शासकीय कार्यालयाचा संपर्क तपशिल माहिती दिलेली असेल.
Ø
प्रस्तावित
लाभार्थ्याची भेट घेतल्यानंतर ‘युवा माहिती दूत’ हे त्या
लाभार्थ्यांचा तपशिल आपल्या मोबाईलमधील ॲप्लीकेशनमध्ये नोंदवितील या तपशिलानुसार
संबंधित योजनांची माहिती ॲप्लीकेशनमधून घेऊन लाभार्थ्याना समजून सांगतील.
Ø
लाभार्थ्यांना हे ॲप्लीकेशन डाउनलोड
करण्यासाठी माहिती दूत प्रेरित करतील. या ॲप्लीकेशनला शासनाचे इतर ॲप्लीकेशन देखील जोडण्यात
आले असल्याने सर्व योजना, उपक्रमांची माहिती लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी मिळणे शक्य
होणार आहे.
Ø
माहिती
व जनसंपर्क महासंचालनालय आणि माहिती दूत यांमध्ये संदेशांची देवाणघेवाण, प्रशिक्षण, पुर्नविलोकन या ॲप्लीकेशनमार्फत होईल.
Ø
मार्गदर्शक, समन्वयक, माहिती
दूत, प्रस्तावित लाभार्थी या सर्वांची नोंदणी मोबाईल क्रमांकाशी निगडीत असेल.
Ø
ज्या योजनेची माहिती
युवकांमार्फत प्रस्तावित
लाभार्थ्यांना द्यावयाची आहे, त्या योजनेची निवड महासंचालनालय हे सर्व विभागांशी
चर्चा केल्यानंतर करेल.
Ø
विविध समाज घटकातील (शेतकरी, महिला, आदिवासी, अल्पसंख्यांक,
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , ज्येष्ठ नागरिक आदी.) असलेल्या वैयक्तिक लाभाच्या
किमान 40 योजना, सामुहिक विकासाच्या 5 योजना आणि स्थानिक पातळीवर महत्वाच्या 5
योजना अशा एकूण 50 योजनांचा समावेश या उपक्रमासाठी केलेले असेल.
कार्यपद्धती
१) जिल्हा माहिती अधिकारी:
या उपक्रमाची
माहिती होण्यासाठी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय
उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. यावेळी मार्गदर्शक, समन्वयक आणि माहिती दूत यांची
बैठक घेण्यात येईल. विविध महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करून मार्गदर्शक आणि
समन्वयकाच्या माध्यमातून महाविद्यालयांना या उपक्रमात नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
२) मार्गदर्शक :
प्रत्येक
महाविद्यालयात मार्गदर्शक नेमण्यात येणार आहेत. माहिती व
जनसंपर्क विभागाकडून देण्यात आलेल्या आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून हे
मार्गदर्शक महाविद्यालयाची नोंदणी करतील. महाविद्यालयातील अध्यापक/ ग्रंथपाल/ अधीक्षक/ क्रीडा शिक्षक यांची ‘मार्गदर्शक’
म्हणून महाविद्यालय निवड करतील. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपैकी इच्छुक
माहिती दूतांची निवड
करण्याचे काम मागर्दर्शक करणार
आहे. त्यानुसार जिल्हा माहिती
अधिकाऱ्यांशी समन्वय साधून माहिती दूताची निवड करण्यात येणार आहे.
३)
समन्वयक :
‘जनसंपर्काची आवड आणि शासकीय
योजनांची मुलभूत माहिती असणाऱ्या तसेच विनामानधन जनसेवा बजावू इच्छिणाऱ्या
व्यक्तींची समन्वयक म्हणून निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी निकष ठरवून दिले
जातील. समन्वयकाचे काम करू इच्छिणाऱ्या व्यक्ती मोबाईल ॲप्लीकेशनमध्ये आपली नोंद
करतील. योजनांचा प्रसार करण्यासाठीचे क्षेत्र निवडण्याचा अधिकार हा माहिती दुताकडे
असणार आहे. माहिती दूताच्या शंकांचे निराकरण समन्वयक करील. संबंधित जिल्हा माहिती
अधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील समन्वयकाची निवड करतील. या समन्वयकांना एक दिवसाचे
प्रशिक्षण दिले जाईल. माहिती दूत-लाभार्थी-जिल्हा माहिती अधिकारी यांच्यात ते
समन्वय साधतील.
४)
युवा माहिती दूत
Ø
या
उपक्रमासाठी स्वेच्छेने तयार असलेल्या/ निवडण्यात आलेल्या सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांना 6 महिन्याच्या कालावधीसाठी ‘युवा माहिती दूत’ म्हणून संबोधण्यात येईल.
Ø
या
कालावधीत किमान 50 प्रस्तावित लाभार्थ्याच्या घरी जाऊन, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासाठी
लागू असणाऱ्या योजनांची माहिती देतील.
Ø
लाभार्थ्यांशी अथवा त्यांच्या परिसराशी निगडित विकास
कामांची माहिती देऊन संबंधितांच्या
प्रतिक्रियेची नोंद करतील.
Ø
या
योजनेच्या प्रसिध्दीकरिता सोशल मिडियाचाही उपयोग करण्यात येईल.
प्रोत्साहन:
Ø
‘युवा
माहिती दूत’ म्हणून काम
केल्यामुळे राज्यशासनाकरिता तळागाळाच्या पातळीवर काम करण्याची महत्वाची संधी
युवकांना मिळेल.
Ø
‘युवा
माहिती दूत’ अशी ओळख
राज्यशासनाच्यावतीने त्यांना देण्यात येईल.
Ø
ठरवून
दिलेले काम केल्यानंतर त्यांना शासनाचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल.
Ø
या
उपक्रमात काम करत असताना सोईचे व्हावे म्हणून त्यांना दैनंदिनी, पेन, आदी. देण्यात येईल.
या उपक्रमातून :
Ø
किमान
1 लाख युवक राज्य शासनाच्या किमान 50 योजनांच्या माहितीशी जोडले जातील.
Ø
या 1
लाख युवकांमार्फत किमान 50 लाख प्रस्तावित लाभार्थ्याशी म्हणजेच किमान 2 ते 2.50
कोटी व्यक्तींशी शासन जोडले जाईल.
Ø युवकांच्या समाजमाध्यमातील प्रभावी वापराचा शासकीय योजनांच्या प्रसारासाठी लाभ होईल.
चला,
तर मग आपण शासनाच्या या मोहिमेत सहभागी होऊन शासनाचा माहिती दूत होऊ या.
संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव
000
No comments:
Post a Comment