Friday, 10 August 2018

महाराष्ट्र भूजल विकास व व्यवस्थापन अधिनियमाचा मसुदा उपलब्ध 31 ऑगस्टपर्यंत हरकती/सुचना पाठवाव्यात

                जळगाव, दि. 10 (जिमाका) - महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम-2009 (2013 चा 26) च्या कलम 57 नुसार महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम -2018 चा मसुदा नियमावलीची अधिसूचना ही पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून हरकती/सुचना व माहितीसाठी दि. 25 जुलै, 2018 रोजी महाराष्ट्र शासनाच्या  https://maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
     याविषयी कोणत्याही व्यक्तीस हरकत अथवा सुचना शासनास पाठवायच्या असल्यास अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, 7 वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय ईमारत संकुल, क्रॅाफर्ड मार्केट जवळ, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई -400001 यांचेकडे 31 ऑगस्ट, 2018 पर्यंत लेखी स्वरुपात अथवा pscc.wssd@maharashtra.gov.in या ईमेलवर पाठवाव्यात. यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती, सुचना विचारात घेतल्या जाणार नाहीत. असे शासनाकडुन प्रसिध्द करण्यात आल्याचे वि. श्री. जवंजाळ, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                     ०००

No comments:

Post a Comment