जळगाव, दि. २४- चाळीसगाव तालुक्यातील दुग्ध प्रक्रीया उद्योगांचे क्लस्टर करीता महाराष्ट्र राज्य औद्योगिक समुह विकास कार्यक्रमांतर्गत सामुहीक सुविधा केंद्र स्थापन करणेसाठी सोमवार, दि. २७ ऑगस्ट, २०१८ रोजी सकाळी ११.00 वाजता जिल्हा उद्योग केंद्र सभागृह, शासकीय आय.टी.आय जवळ, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६, जळगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी दिली आहे.
चाळीसगाव व आजुबाजुच्या परिसरातील सर्व दुग्धप्रक्रीया उद्योजकांनी या बैठकीस उपस्थित राहावे. असे आवाहन अध्यक्ष, जिल्हास्तरीय औद्योगिक समुह सनियंत्रण समिती तथा महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:
Post a Comment