जळगाव, दि. 4 - साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ९८ वी जयंती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
विकास महामंडळ (मर्या) जळगाव कार्यालयात साजरी करण्यात आली आहे.
जयंती निमित्ताने मार्च/एप्रिल २०१८ मध्ये शैक्षणिक
वर्गात जास्त गुणानुक्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मुलां/मुलींचा गौरव व रेखाकिंत
धानादेशाव्दारे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. या कार्यक्रमास अपर
जिल्हाधिकारी श्रीमती हिंगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
याप्रसंगी कृ निशा प्रभुदास कसबे, कु. शिवराज धनराज
म्हस्के, कु. कविता गौतम उमप, कु. वर्षा रमेश मरसाळे या गुणवंत विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्ती धनादेशाव्दारे वितरण करण्यात आली. यावेळी श्री. योगेश पाटील, जिल्हा
समाज कल्याण अधिकारी, श्री. एस.एन. आरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, श्री. नामदेव मोरे, सामाजिक कार्यकर्ते, श्री. रमेश कांबळे,
सा.लो.अ. सा पुरस्कार, श्री. डी. बी. खरात, सा. लो. अ. सा. पुरस्कार, श्री. जी. जे
पगारे, कार्यालयीन सहाय्यक व सर्व महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
श्री. रमेश कांबळे व डी. बी. खरात साहित्यरत्न लोकशाहीरअण्णाभाऊ साठे पुरस्कार
यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चारित्राबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन श्री. पारधे व श्री. योगेश नवले यांनी केले. साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जळगावचे जिल्हा व्यवस्थापक श्री. टि. व्ही. कसबे व
कु. मिनाक्षी अरुण टुंबरे, कार्यालयीन सहाय्यक यांनी मान्यवरांचे आभार मानले.
000
No comments:
Post a Comment