जळगाव, दि. २९ - महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत
ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक
विकास व्हावा, त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. या
उद्देशाने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय
चळवळीस योगदान देणा-या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी
अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून
डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार
देण्यात येतो.
राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब,
क, ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये ५० हजार रुपये,
३० हजार रुपये, २० हजार रुपये, १० हजार रुपये रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि
प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.
राज्यातील प्रत्येकी एक उत्कृष्ट
कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रुपये २५ हजार रुपये रोख रक्कम, शाल, श्रीफळ
आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभाग स्तरावर प्रत्येकी एक
कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रुपये १५ हजार रुपये रोख रक्कम, शाल, श्रीफळ
आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.
सन २०१८-१९ च्या पुरस्कार योजनेत
सहभागी होण्यासाठी ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज
दिनांक २८ सप्टेंबर, २०१८ पर्यत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथलय
अधिकारी यांचे कार्यालयाकडे सादर करावेत, असे आहवान श्री सुभाष हि. राठोड प्र.
ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी
एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000
No comments:
Post a Comment