Friday, 24 August 2018

सार्वजनिक गणेशोत्सव पुर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन

     जळगाव, दि. २४ - जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत तसेच कायदा व सुव्यवस्थेचा भंग न होता आदर्शरितीने साजरा व्हावा. याकरीता सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सर्व सदस्य आणि जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिका-यांची गणेशोत्सवाची पुर्वतयारी बैठक जिल्हादंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचे अध्यक्षतेखाली आज शनिवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०१८ रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा नियोजन भवन सभागृहात आयोजीत करण्यात आलेली आहे.
      या जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी या बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे. असे अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        000

No comments:

Post a Comment