Saturday, 18 August 2018

९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला लस दयावी - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर




गोवर व रुबेल लसिकरण कार्यशाळा जिल्हाधिका-यांच्या उपस्थिती संपन्न
१४ नोव्हेंबर बालदिनी राज्यात लसीकरणाचा शुभारंभ
        जळगाव, दि. 16 जिल्हयातील  9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकास गोवर व रुबेल लस दयावी. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी  अशा सुचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज केल्या.
          केंद्र सरकार, राज्यशासन व  जिल्हा परिषदेच्या  आरोग्य विभागामार्फत जैन हिल्स येथील हंडा सभागृहात  गोवर व रुबेला लसीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
          यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे एम एम ओ डॉ. कमलाकर  लष्करे  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी जि.प. अध्यक्षा उज्वलाताई पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. कमलापूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ  अमोल पांढरे, जिल्हा प्राथमिक वैद्यकीय अधिकारी डॉ. बी आर पाटील, डॉ. समाधान वाघ, डॉ दिलीप पाटोळे उपस्थित होते.
          जिल्हयातील 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील 100 टक्के बालकांना गोवर व रुबेलाचे लसीकरण  जातीने  करुन घ्यावे यासाठी  वैद्यकीय अधिकारी, शिक्षक व पालकांना   जिल्हाधिकारी किशोर राजे  निंबाळकर यांनी  आवाहन  केले.
         जिल्हाधिकारी निंबाळकर म्हणाले की, जिल्हयातील गोवर व रुबेला लसीकरणासाठी पात्र लाभार्थी बालकांचा शोध आरोग्य विभागाने  घेवून अशा सर्व बालकांचे लसीकरण करुन घ्यावे तसेच पालकांनीही आपल्या 9 ते 15 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाचे लसीकरण करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले
         जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस कमलापुरकर यांनी कार्यशाळेची प्रस्तावना व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. जिल्ह्यातील गोवर व रूबेला लसीकरणासाठी पाञ लाभार्थी बालकांचा शोध व पाञ बालकांची यादी तयार करून लसीकरण करणे , आरोग्य विभाग व शिक्षण विभागासह, आशा,अंगणवाडी सेविका यांचे मार्फत घेऊन नोव्हेंबर ते डिसेंबर 2017 मध्ये इंजेक्शन लसीकरणाचे 100% उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी सर्व विभागाचे अधिकारी व वैद्यकीय अधिकारी कामकाज करतील असे नमूद करतील. जगातून गोवरमुळे मृत्यू होण्याचे भारतातील प्रमाण हे  एक तृतीयांश एवढे भयंकर आहे.  कार्यशाळा आयोजनाबातची पार्श्वभूमी सांगितली. या कार्यशाळेस सर्व तालुका आरोग्य अधिकारी , शिक्षणाधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी, प्राथमिक आरोग्य्‍ केंद्राचे प्रथम वैक्षकीय अधिकारी उपस्थित होते. प्रसंगी धन्वंतरी पुजन करण्यात आले.
        कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. प्रमोद सोनवणे यांनी केले. कार्यशाळेस सर्व तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे प्रथम वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. सूञसंचालन डॉ. प्रमोद सोनवणे यांनी केले.
                                                                               ०००

No comments:

Post a Comment