जळगाव, दि. 10 (जिमाका) - धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्यता प्राप्त अनुदानित/विना अनुदानित/कायम विनाअनुदानित खाजगी अल्पसंख्यांक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येते.
सन 2018-19 साठी अनुदान प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यातील इच्छूक शैक्षणिक संस्थांनी शासन निर्णय क्र. अविवि-2015/प्र.क्र.80/15/का.6/दि. 7 ऑक्टोबर 2015 च्या तरतूदीनुसार विहित नमुन्यात अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दिनांक 14 ऑगस्ट, 2018 पर्यंत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे दिनेश वाघ, सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, तथा जिल्हा नियोजन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000

No comments:
Post a Comment