जळगाव, दि. 10 (जिमाका) - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा नामविस्तार शनिवार दिनांक 11 ऑगस्ट, 2018 पासून अंमलात येणार आहे. या नामविस्तारानिमित्त आनंद सोहळा मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांच्या उपलब्धतेनुसार लवकरच घेतला जाणार आहे.
जुलै महिन्यात नागपूर येथे झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा नामविस्तार करण्याचे विधेयक एकमताने मंजूर झाले होते. 11 ऑगस्ट, 2018 रोजी हा नामविस्तार करण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अधिवेशनाच्या काळात केली होती. नामविस्ताराची अधिसूचना विद्यापीठाला आज (शुक्रवारी) प्राप्त झाली असून त्यानुसार शनिवार दिनांक 11 ऑगस्ट, 2018 पासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा नामविस्तार करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार शनिवार पासून नामविस्तार अंमलात येणार आहे. मात्र या नामविस्ताराचा आनंद सोहळा मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपलब्ध तारखेनुसार लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती कुलसचिव श्री. भ. भा. पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्व्ये दिली आहे.
000

No comments:
Post a Comment