Monday, 20 August 2018

महिला लोकशाही दिनात तीन तक्रार अर्ज प्राप्त



            जळगाव, दि. 20 - दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन आज अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.
             आजच्या महिला लोकशाहीदिनात  पोलिस विभाग, महानगर पालिका व तहसिलकार्यालय चाळीसगाव या कार्यालया संदर्भातील प्रत्येकी एक या प्रमाणे एकूण तीन तक्रारी अर्ज प्राप्त झाले असून ते संबंधीत विभागांकडे पुढील कार्यावाहीस्तव पाठविण्यात आले असून संबंधीत विभागानी तक्रारी अर्जाचा लवकरात लवकर निपटारा करावा अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी श्री. गाडीलकर यांनी सर्व संबंधितांना दिल्यात.
          या प्रसंगी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थाचे प्रतिनिधी, पोलिस विभागाचे वरीष्ठ महिला पोलिस अधिकारी, सदस्य सचिव तथा  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व संरक्षण अधिकारी हे उपस्थित होते. अध्यक्षांनी लोकशाही दिनातील प्रलंबीत अर्ज व निकाली अर्जाचा आढावा घेतला, 
०००

No comments:

Post a Comment