जळगाव, दि. 29 - पोस्टाच्या कामासंबंधीच्या
ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निवारण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले
नसेल, अशा तक्रारींच्या निराकरणासाठी चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल,
मुंबई यांचे कार्यालय, मुंबई जी.पी.ओ. बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई 400001, येथे
दि. 26 सप्टेंबर, 2018 रोजी सकाळी अकरा वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
या
अदालतीत टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बॅंक खाते, प्रमाणपत्र या संदर्भातील तक्रारी
विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह करावा. डाकसेवेबाबतची
तक्रार दोन प्रतीत आर. एन. चेटुले, सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज.शि) तथा सचिव डाक
अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल, मुंबई जी.पी.ओ. बिल्डिंग,
दुसरामाळा, मुंबई 400001, यांच्या नावे
दि. 12 सप्टेंबर, 2018 पर्यंत पाठवावी, असे आवाहन मुख्य पोस्टमास्टर जनरल,
महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment