जळगाव, दि. 29 - भारत
निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशान्वये
18 पाचोरा विधानसभा मतदार संघातील मतदार यादी अद्यावत करणेत येत आहे. अशी माहिती
राजेंद्र कचरे, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,पाचारो भाग, पाचोरा
यांनी दिली आहे.
ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीत नाहीत
व ज्या मतदारांचे कृष्णधवल छायाचित्रे मतदार यादीत आहेत. अशा सर्व मतदारांचे रंगीत
फोटो जमा करणे व मतदार यादी अद्यावत करणेसाठी स्वतंत्र अभियानाचे आयोजन करण्यात येत
आहे. या अभियानाचा कालावधी हा दिनांक 1 ते
7 सप्टेंबर, 2018 राहील.
याकरीता 18 पाचोरा विधानसभा मतदार
संघातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की, भारत सरकारचे निवडणुक विषयक अत्यंत
महत्वाचे कामकाज 100% पुर्ण होण्याकरीता मतदार संघातील सर्व पर्यवेक्षक, मतदान
केंद्रस्तरीय अधिकारी (B. L. O) मंडालाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील,
कोतवाल यांच्या नेमणुका या कामकाजाकरीता करण्यात आलेल्या आहेत. व प्रस्तुत कामकाजा
करीता त्यांच्या स्वतंत्र प्रशिक्षण वर्गाचे आयोजनही केलेले आहे. या कर्मचाऱ्यांपैकी कुणीही संबधित
मतदारांकडे उपरोक्त कालावधीत जावून अथवा त्यांचेशी संपर्क साधुन रंगीत फोटोची
मागणी करणार आहेत.
त्यावेळी सर्व मतदारांनी संबधित
कर्मचारी यांना उत्तम प्रकारे प्रतिसाद द्यावा व त्यांना रंगीत फोटो उपलब्ध करुन
देवुन प्रस्तुत निवडणुक विषयीचे अत्यंत महत्वाचे कामकाज 100% पुर्ण करण्याकरीता
सहकार्य करावे. असे आवाहन राजेंद्र कचरे, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय
अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment