जळगाव, दि. 10 (जिमाका) - डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतंर्गत सन 2018-19 मध्ये ज्या मदरसांमध्ये पारंपारिक धार्मिक शिक्षण देण्यात येते. तसेच पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबर विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दु या विषयाचे शिक्षण देण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्यांना आधुनिक शिक्षणाकरिता पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान आवश्यक आहे. अशा मदरशांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
असे मदरसा/मदरसे चालविणा-या संस्था धर्मदाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. जळगाव जिल्हयातील फक्त निवासी इच्छुक मदरशांनी शासन निर्णय क्र. अविवि-2010/ प्र.क्र. 152/10/का 6/ दि. 11 ऑक्टोंबर, 2013 च्या तरतूदीनुसार विहित नमुन्यात अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दिनांक 14 ऑगस्ट 2018 पर्यंत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे दिनेश वाघ, सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, तथा जिल्हा नियोजन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:
Post a Comment