Friday, 3 August 2018

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात


 जळगाव, दि. 3 - भारतीय स्वातंत्र्याचा 71 वा वर्धापन दिनोत्सवानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम 15 ऑगस्ट, 2018 रोजी सकाळी 9 वा 5 मि. नी. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
या मुख्य शासकीय समारंभात शहरातील जास्तीत जास्त नागरीकांना भाग घेता यावा यासाठी 15 ऑगस्ट,  2018 रोजी सकाळी 8.35 ते 9.35 वाजेच्या दरम्यान ध्वजारोहणाचा  किंवा कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहणाचा समारंभ करावा असे वाटत असेल तर त्यांनी तो त्यादिवशी सकाळी 8.30 च्या पूर्वी किवा 9.35 च्या नंतर करावा. 
या मुख्य शासकीय समारंभास जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, नागरीक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी केले आहे.
०००

No comments:

Post a Comment