जळगाव, दिनांक 10 (जिमाका) - जिल्ह्यातील नाट्य रसिकांच्या मागणीनुसार महाबळ परिसरात पूर्णत्वास आलेल्या नवीन नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा शनिवार 11 ऑगस्ट, 2018 रोजी सायंकाळी 5.30 वाजता राज्याचे महसुल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरिष महाजन हे आहेत. तर सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वलाताई पाटील, प्रभारी महापौर गणेश सोनवणे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास खासदार ए. टी. नाना पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, सौ. स्मिताताई वाघ, चंदुलाल पटेल, किशोर दराडे, विधानसभा सदस्य सर्वश्री. एकनाथराव खडसे, डॉ. सतीष पाटील, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, शिरीषदादा चौधरी, उन्मेष पाटील, किशोर पाटील हे विशेष निमंत्रीत म्हणून उपस्थित राहणार आहे.
तरी या लोकार्पण सोहळा कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांचे सभापती, पंचायत समित्यांचे सभापती, नगरपालिकांचे नगराध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, महानगरपालिकेचे व नगरपालिकांचे आजी, माजी नगरसेवक, शासकीय अधिकारी, जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी, नाट्यप्रेमी रसिकांनी व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.
000
000
No comments:
Post a Comment